गांधी-नेहरु घराण्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री पायल रोहतगीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पायल रोहतगीने जामीनासाठी केलेली याचिका न्ययालयाने फेटाळून लावली आहे. २४ डिसेंबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Rajasthan: Model & actress Payal Rohatgi who was arrested by Police over her comment on former Prime Minister Pandit Jawaharlal Nehru, has been sent to eight day judicial custody by a local court in Bundi pic.twitter.com/6bFm2onRvG
— ANI (@ANI) December 16, 2019
सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली: फडणवीस
पायल रोहतगीला सोमवारी एसीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळत तिला ८ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पायल रोहतगीच्या अटकेनंतर तिचा पती संग्राम सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मदतीची मागणी केली होती. मात्र त्याला याप्रकरणी कोणतिही मदत मिळाली नाही.
आधी हिंसा थांबवा, आंदोलक विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाने सुनावले
दरम्यान, वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी रविवारी पायल रोहतगीला अहमदाबाद येथील निवासस्थानावरुन राजस्थान पोलिसांनी अटक केली होती. त्यापूर्वी राजस्थानमधील बूंदी पोलिस ठाण्यात पायलविरोधात मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि गांधी-नेहरु कुटुंबियांविरोधात वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी पायल रोहतगीला नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले होते.