पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता इरफान खानचे निधन

इरफान खान

बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. इरफान खान यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांच्या अचानक निधनानं बॉलिवूडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मार्च महिन्यात प्रदर्शित झालेला  'अंग्रेजी मीडियम' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

देशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग

गेल्या दोन वर्षांपासून इरफान आजारी होते. २०१८ मध्ये त्यांना न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारखा दुर्धर आजार झाला होता. या दुर्धर आजारावर मात करुन ते पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले होते. २०१८ मध्ये आजाराचं निदान झाल्यानंतर ते परदेशी उपचारांसाठी गेले होते. या आजारावर यशस्वी मात करुन ते भारतात परतले. तर २०१९ मध्ये त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचं चित्रीकरणही पार पाडलं होतं. मार्च महिन्यात त्यांचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, मात्र लॉकडाऊनचा फटका या चित्रपटला बसला. थिएटर बंद असल्यानं हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. 

चीनमुळे आज १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागताहेत - डोनाल्ड ट्रम्प

सलाम बॉम्बे, मकबुल, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स, हैदर, गुंडे, पिकू, तलवार, हिंदी मीडियम, कारवाँ हे त्यांचे चित्रपट खूपच लोकप्रिय ठरले होते. सलाम बॉम्बे या चित्रपटात पहिल्यांदा त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकले नाही. आईचं अंत्यदर्शनही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आले नाही ही सल त्यांच्या मनात होती.