पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शबरीमला मंदिरात प्रवेश केलेल्या बिंदूंवर मिरची पावडर फेकली, तृप्ती देसाईही कोचीमध्ये

बिंदू अमिनी

जानेवारी महिन्यात केरळमधील शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे चर्चेत आलेल्या बिंदू अमिनी यांच्यावर कोचीतील पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात मिरची पावडर फेकण्यात आली. बिंदू या पुन्हा एकदा शबरीमला मंदिरात जाणार होत्या. त्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, ही मागणी करण्यासाठी त्या पोलिस आयुक्त कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सुद्धा होत्या. 

अजित पवारांना अधिकारच नाहीत, मी तुमची जबाबदारी घेतोय : शरद पवार

आपण पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात असताना जमावाने मला धक्काबुक्की केली आणि माझ्यावर मिरची पावडर फेकली, असे बिंदू यांनी सांगितले. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तृप्ती देसाई या पोलिस आयुक्त कार्यालयातच आहेत. 

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अद्याप कोणतीही स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही शबरीमला मंदिरात प्रवेश करू शकतो, असे तृप्ती देसाई यांचे म्हणणे होते. त्यासाठीच आम्ही सकाळी विमानाने कोचीला आलो. पण कोचीला आल्यापासून आमचा विरोध केला जातो आहे, असेही त्यांनी सांगितले.

नितीन गडकरी शहाणे राजकारणी वाटत होते, शिवसेनेचा टोला

मंगळवारी ७० वा राज्यघटना दिन आहे. त्यामुळे जुन्या रुढी-परंपरा मोडण्याचा हाच दिवस आहे. जर आम्हाला कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही न्यायालयात अवमान याचिका दाखल करू. आमच्या दौऱ्याबद्दल आम्ही केरळचे मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक यांना आमच्या दौऱ्याबद्दल कळवले होते, असेही तृप्ती देसाई यांनी सांगितले.