पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्हाला पराभव मान्य, कर्नाटकमधील निकालानंतर शिवकुमार यांचे उत्तर

डी के शिवकुमार

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत १५ पैकी १२ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीत आपला पराभव होत असल्याचे काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले, पोटनिवडणूक होत असलेल्या १५ जागांवर तेथील मतदारांना जो कौल दिला आहे तो आपण मान्य केला पाहिजे. ज्यांनी पक्षात बंडखोरी केली त्यांना मतदारांनी स्वीकारले आहे. त्यामुळे आम्ही आमचा पराभव मान्य करतो. 

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण: एसआयटीमार्फेत होणार तपास

कर्नाटकमधील १५ जागांवरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी होते आहे. मतमोजणीच्या आठ फेऱ्यानंतर १५ पैकी १२ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. हाच कल कायम राहिल्यास राज्यातील भाजपसाठी हा मोठा विजय असणार आहे. कर्नाटकमधील बी एस येडियुरप्पा यांचे सरकार टिकण्यासाठी किमान ६ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. पण त्या पेक्षा जास्त जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, अशी स्थिती सध्या दिसते आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी आपला पराभव मान्य केला आहे. 

... अखेर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!

कर्नाटक विधानसभेत २०८ जागा आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला कोणत्याही स्थितीत १०५ जागा मिळवणे आवश्यक आहे. सध्याच्या पक्षीय बलानुसार भाजपला किमान सहा ठिकाणी विजय मिळवणे आवश्यकच आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या ६६ तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या ३४ जागा आहेत.