पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल - लष्करप्रमुख

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक पाऊल असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे. ७२ व्या सेना दिवसानिमित्त बुधवारी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

ऍमेझॉनकडून देशातील छोट्या उद्योगांसाठी मोठी घोषणा

लष्करप्रमुख म्हणाले, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेजारील देशाकडून सुरू असलेले छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) मोडीत निघाले आहे. त्याच बरोबर या निर्णयामुळे जम्मू-काश्मिरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्याला मदत होणार आहे. दहशतवाद्यांविरोधात यापुढील काळातही कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाडिया रुग्णालयावर अखेर तोडगा; सरकार ४६ कोटींचा निधी देणार

दहशतवादाचा प्रसार करणाऱ्या आणि त्याला पाठबळ देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे अनेक मार्ग आहेत आणि वेळप्रसंगी या मार्गांचा वापर करण्यासाठी भारत मागे-पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.