पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गर्भपातासाठीच्या कालावधीत वाढ, सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

गरोदर महिला (संग्रहित छायाचित्र)

गरोदर महिलेला गर्भपात करण्यासाठी सध्याच्या २० आठवड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता २४ आठवड्यांपर्यंत गरोदर महिला गर्भपात करू शकते. यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून, त्यासाठी संसदेमध्ये विधेयक मांडले जाणार आहे.

जेडीयू नेत्याने प्रशांत किशोर यांची तुलना केली 'कोरोना विषाणू'शी

वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक २०२० ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे संबंधित गरोदर महिलेला आहे. त्यामुळेच गर्भपात करण्यासाठीच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

गर्भपात करण्यासाठीचा कालावधी वाढविण्याच्या निर्णयाचा बलात्कार पीडित महिला, अल्पवयीन मुली आणि दिव्यांग महिलांना उपयोग होणार आहे. या स्वरुपाच्या महिलांना अनेकवेळा आपण गरोदर आहोत, हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळेच त्यांना या निर्णयाचा फायदा होईल. अनेकवेळा पाच महिन्यांपर्यंत संबंधित महिलेला आपण गरोदर आहोत हे लक्षात येत नाही. त्यानंतर गर्भपात करण्याची इच्छा असेल तर संबंधित महिलेला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागतो. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सायना नेहवालचा भाजप प्रवेश

गर्भपात करण्यासाठीचा कालावधी वाढविल्यामुळे गरोदरपणातील महिला मृत्यूची संख्याही कमी होईल, असे सरकारने म्हटले आहे.