पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकचे विमान पाडणाऱ्या अभिनंदन यांनी हवाईदल प्रमुखांसह MiG-21मधून घेतली पुन्हा झेप

पाकचे विमान पाडणाऱ्या अभिनंदन यांनी हवाईदल प्रमुखांसह MiG-21मधून घेतली पुन्हा झेप (ANI photo)

पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडणारे भारतीय हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आज पुन्हा अवकाशात भरारी घेतली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्याबरोबर हवाईदल प्रमुख बी एस धनोआ हेही होते. नुकतेच २७ फेब्रुवारी २०१९ला पाकिस्तान हवाईदलाचे लढाऊ विमान पाडण्याची धाडसी कामगिरी करणारे अभिनंदन यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. विंग कमांडर अभिनंदन यांनी आज पठाणकोट एअरबेसवरुन मिग-२१ विमानात हवाईदल प्रमुख धनोआ यांच्यासह झेप घेतली. 

पठाणकोट एअरबेस भारतीय हवाईदलाच्या २६ स्क्वाड्रनचे फ्रंटलाईन फायटर बेस आहे. भारतीय हवाई दलाकडे रशियन बनावटीच्या मिग-२१ लढाऊ विमानांचे १० स्क्वाड्रन आहेत. 

पाकिस्तानी लढाऊ विमानाला पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन हे २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी हद्दीत गेले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून त्यांना बंदी बनवण्यात आले होते. अभिनंदन यांची नुकतीच वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना उड्डाण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. ज्यावेळी अभिनंदन यांनी पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ १६ जमीनदोस्त केले होते. त्यावेळीही ते मिग-२१ विमान उडवत होते. 

हवाईदल प्रमुख धनोआ हेही मिग-२१ वैमानिक आहेत. त्यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानला धुळ चारली होती.