पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर होण्याची शक्यता

अभिनंदन वर्थमान

पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर मिराज विमानांच्या साह्याने हल्ला करणाऱ्या भारतीय जवानांना आणि भारताच्या दिशेने आलेले पाकिस्तानचे एफ १६ लढाऊ विमान पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वायूसेना पदकांनी गौरविण्यात येणार आहे. अभिनंदन यांना वीरचक्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

२७ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांच्या तळांवर मिराज विमानांच्या साह्याने बॉम्ब हल्ले करणारे मिराज विमानातील चमूला वायूसेना पदकाने गौरविण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाने अत्यंत चोख नियोजन करून पाकिस्तानला थांगपत्ता लागू न देता ही कारवाई केली होती. 'हिंदुस्थान टाइम्स'ने सर्वात आधी २० एप्रिल रोजीच अभिनंदन आणि मिराज विमानातील चमूला वायूसेना पदकाने गौरविण्यात येणार असल्याचे वृत्त दिले होते.

अभिनंदन यांनी भारताच्या दिशेने येत असलेले पाकिस्तानचे एफ १६ विमान आपल्याकडील मिग २१ विमानाच्या साह्याने पाडले होते. यावेळी त्यांच्या मिग २१ वर क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे त्यांनी पॅराशूटच्या साह्याने त्यातून उडी मारली होती. ते पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यावर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते. पण ६० तासांनंतर त्यांना भारताकडे सुपूर्द करण्यात आले होते.

पाकने व्यापारी संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांनाही देश सोडण्याचे आदेश

१४ फेब्रुवारी रोजी काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गाडीवर आत्मघाती दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने बालाकोटमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले होते. केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करून हा हल्ला घडवून आणण्यात आला होता. यासाठी भारतीय हवाई दलाची मिराज २००० विमाने वापरण्यात आली होती.