पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वॉड्रनचा हवाईदलाकडून सन्मान

अभिनंदन वर्थमान

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय लष्कराच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या स्क्वॉड्रनचा हवाईदलाकडून सन्मान केला जाणार आहे. अभिनंदन यांच्या ५१ व्या स्क्वॉड्रनला हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया सन्मानपत्र देतील. स्क्वॉड्रनकडून कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हा सन्मान स्वीकारतील.

'गोडसे देशभक्त की मारेकरी?, मोदी-शहांनी भूमिका स्पष्ट करावी'

विंग कमांडर अभिनंदन यांनी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानचे एक एफ-१६ हे लढाऊ विमान पाडले होते. या दरम्यान त्यांचे मिग-२१ हे विमानही अपघातग्रस्त झाले होते. त्यावेळी अभिनंदन हे एलओसीच्या पलीकडे उतरले होते. त्यानंतर भारताच्या दबावानंतर पाकिस्तानला त्यांना सोडून द्यावे लागले होते.

अभिनंदन वर्थमान यांच्या ५१ व्या स्क्वॉड्रनशिवाय स्क्वॉड्रन क्रमांक ९ लाही सन्मानित केले जाणार आहे. स्क्वॉड्रन ९ च्या मिराज-२००० लढाऊ विमानांनी २६ फेब्रवारीला पाकिस्तानमधील बालाकोट स्थित जैश-ए-मोहम्मदच्या सर्वांत मोठ्या दहशतवादी शिबिरावर एअर स्ट्राइक केले होते. या अभियानाला 'ऑपरेशन बंदर'चे नाव देण्यात आले होते. हवाईदल प्रमुख स्क्वॉड्रन ९ लाही प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे.

अनंतनागमध्ये उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला, ८ जण जखमी

त्याचबरोबर ६०१ सिग्नल यूनिटच्या स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनाही बालाकोट एअर स्ट्राइकला यशस्वी करण्यात आणि पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात महत्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Abhinandan Varthaman 51 Squadron awarded by IAF Chief RKS Bhadauria for Shoot down Pakistani F 16