भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना 'जागतिक दारिद्र्य निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टीकोन' या विषयावरील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. अभिजित बॅनर्जी त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाले. ही नक्कीच बॅनर्जी यांच्यासाठी आनंदाची बाब होती. मात्र हे पुरस्काराची बातमी ऐकल्यानंतर बॅनर्जी लगेच झोपी गेले.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त
हे वृत्त खरं असल्याचं ते पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 'न्यूयॉर्कमधल्या प्रमाणवेळेनुसार सकाळी लवकर हे पुरस्कार जाहीर झाले. पहाटे लवकर उठणाऱ्यांपैकी मी नव्हे. मी असं केलं असतं, तर नक्कीच माझ्याकडून कार्यप्रणालीचा भंग केला असता. त्यामुळे मी झोपी गेलो', असं ते वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले. न्यूयॉर्कमधल्या प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता हे पुरस्कार जाहीर झाले.
महाराष्ट्राच्या प्रांजल पाटील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी
५८ वर्षांच्या अभिजित बॅनर्जी यांचा जन्म १९६१ मध्ये कोलकत्यात झाला होता. त्यांनी कोलकाता विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये हार्वर्डमधून पीएच डी केली होती.