पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली.

आरे कॉलनीतील वृक्षतोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई मेट्रो तीनच्या कारशेड उभारणीच्या कामाला कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आरे कॉलनीमध्ये मेट्रोसाठी कारशेड तयार करण्याचे काम सुरूच राहणार आहे. न्यायालयाने या ठिकाणी किती झाडे तोडण्यात आली. त्याबदल्यात किती झाडे लावण्यात आली आहेत आणि किती झाडांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे, याचीही माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाला विचारली आहे.

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात जुंपली

आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी २६०० झाडे तोडण्याला वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली होती. त्यानंतर या ठिकाणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. दोन आठवड्यांपूर्वी या ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली. त्यावेळीही या ठिकाणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आंदोलन केले होते. काही जणांनी वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने वृक्षतोडीला २१ ऑक्टोबरपर्यंतची तात्पुरती स्थगितीही दिली होती. पण या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.