पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरे प्रकरणः मेट्रोसाठी वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई मेट्रो योजनेसाठी वृक्षतोडीस दोन आठवड्यांची स्थगिती दिली. यादरम्यान वृक्षतोडी करता येणार नाही. सरन्यायाधीश एस ए बोबडे, न्या. बी आर गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या पीठाने मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या मेट्रोच्या चौथ्या योजनेसाठी वृक्षतोडीस दोन आठवड्यांपर्यंत 'जैसे थे' स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

नासाने चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरला शोधले, छायाचित्र केले जारी

पीठाने ठाण्यात मुंबई मेट्रो योजनेसाठी वृक्षतोडीबाबत सामाजिक कार्यकर्ते रोहित जोशी यांच्या वकिलांना आपल्या याचिकेत दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आणि आजपासून दोन आठवड्यांसाठी वृक्ष तोडीवर स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण आणि राज्य सरकारला नोटीस जारी करुन दोन आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

शरद पवार म्हणाले मोदींनी ऑफर दिली होती, पण...