पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपचे आमदार सोम दत्त यांना झटका; ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा

सोम दत्त

विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतल आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे आमदार सोम दत्त यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने २०१५ मधील एका प्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सोम दत्त यांची रवानगी तिहार तुरुंगात केली आहे. 

चिदंबरम यांच्या आत्मसमर्पण अर्जावरील निकाल कोर्टाने ठेवला

सोम दत्त यांना न्यायाधीश समर विशाल यांनी काही दिवसांपूर्वी सहा महिन्यांची शिक्षा सुनावत दंड ठोठावला होता. मात्र सोम दत्त यांनी या निर्णयाविरोधात सत्र न्यायालायत धाव घेतली होती. सोम दत्त यांच्या याचिकेला फेटाळून लावत न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. 

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला: शस्त्र साठ्यासह तिघांना अटक

जानेवारी २०१५ मध्ये सोम दत्त यांनी गुलाबी बाग येथे राहणाऱ्या संजीव राणा यांना मारहाण केली होती. सोम दत्त आपल्या ५० कार्यकर्त्यांसोबत राणा यांच्या घरी जाऊन त्यांना बॅटने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. 

पुढच्या वर्षी लवकरच येणार बाप्पा!