पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अलका लांबांनी घेतील सोनिया गांधींची भेट; काँग्रेस प्रवेशाची शक्यता

अलका लांबा

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला झटका बसण्याची शक्यता आहे. आपच्या आमदार अलका लांबा काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अलका लांबा यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील १० जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. बराच वेळ त्यांच्यामध्ये चर्चा रंगली होती.

J&K : सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना विमा संरक्षणाचे आश्वासन

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अलका लांबा यांनी ट्विट केले आहे.  सोनिया गांधींसोबतचा फोटो शेअर करत अलका लांबा यांनी असे म्हटले आहे की, 'सोनिया गांधी या केवळ काँग्रेसच्या अध्यक्षाच नाही तर यूपीएच्या अध्यक्षा आहेत. तसंच त्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या खूप मोठ्या नेत्या आहेत. देशाच्या सद्यस्थितीवर त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करणे बाकी होते. आज ती संधी मिळाली आणि खूप चर्चा झाली.'

चिदंबरम यांना दिलासा, तिहार तुरुंगात जाणे तूर्त टळले

अलका लांबा यांनी सोनिया गांधीची भेट घेतल्यानंतर त्या लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होतील अशा चर्चांना उधाण आले आहे. आम आदमी पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या अलका लांबा यांनी अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले आहे. त्या आधी एनएसयूआय आणि काँग्रेसमध्ये होत्या. 

Share Market: सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला