पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा: आपच्या १५ आमदारांचा पत्ता कट, महिला उमेदवारांना प्राधान्य

अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच्या सर्व ७० उमेदवारांची यादी आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली तर उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया पटपडगंड विधानसभा या आपल्या जुन्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ७० संख्याबळ असलेल्या दिल्लीच्या विधानसभेत सध्याच्या घडीला भाजपचे ४ आमदार आहेत. तर ६१ आमदार हे आपचे आहेत. यातील १५ आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.

होय शरद पवार जाणता राजा आहेत; जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आगामी विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वांच्या नावाचा समावेश आहे. या यादीमध्ये सध्याच्या ४६ आमदारांसह एका मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या एका उमेदवारावर पार्टीने विश्वास दाखवला आहे. 

'दालनं, पालकमंत्र्यांची भांडणं संपली की सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल'

२०१९ मध्ये लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या आतिशी, दिलीप पांडे आणि राघव चड्डा यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान आमदारांचे तिकीच कापून त्यांना संधी देण्यात आली असून त्याचा विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मागील निवडणुकीत आम आदमी पक्षाने सहा महिला उमेदवारांना संधी दिली होती. यावेळी आपकडून आठ महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.  

JNU हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे मोबाईल जप्त करा: दिल्ली हायकोर्ट

८ फेब्रुवारीला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. २१ जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ५८ जागा या खुल्या वर्गातील असून १२ जागा या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:AAP Candidates List Arvind Kejriwal Manish Sisodia Aam aadmi party release first full list MLA tickets