पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

AAP उमेदवार अतिशींना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, गंभीरवर आरोप

आपच्या उमेदवार आतिशी यांना अश्रू अनावर झाले.

पूर्व दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार अतिशी यांना गुरुवारी पत्रकार परिषदेतच अश्रू अनावर झाले. अतिशी यांनी पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार आणि क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या रिंगणात उतरलेल्या गौतम गंभीर यांच्यावर अपमानजनक टिप्पणी असलेली पत्रके वाटल्याचा आरोप केला आहे. हे सांगत असताना त्यांना आपल्या भावनांवर निंयत्रण ठेवता आले नाही आणि त्या रडू लागल्या. यावेळी तिथे उपस्थितीत असलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. 

प्रियांका गांधी आपला वेळ का वाया घालवताहेत, केजरीवाल यांचा प्रश्न

अतिशी म्हणाल्या की, माझा गौतम गंभीर यांना प्रश्न आहे, जर ते माझ्यासारख्या सशक्त महिलेला पराभूत करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर येऊ शकतात. तर खासदार झाल्यानंतर ते आपल्या मतदारसंघातील महिलांना कसे सुरक्षित ठेवतील.

आप प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन गौतम गंभीर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गौतम गंभीर या पातळीवर येऊ शकतील असे कधीही वाटले नव्हते. जर लोकांनी अशी मानसिकता असलेल्यांना मते दिली तर महिला सुरक्षेची कशी अपेक्षा करतील, असे त्यांनी म्हटले. अतिशी तुम्ही धीटपणे राहा, हा काळ तुमच्यासाठी किती कठीण आहे, मी समजू शकतो. अशा शक्तींविरोधातच आपल्याला लढायचे आहे, असेही त्यांनी म्हटले. 

जाणून घ्या केजरीवालांसोबत घडलेल्या धक्कादायक घटना