पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे

दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे कारण नेमके काय हे स्पष्ट झालेले नाही. राज्यात काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे सत्तेत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. बंद खोलीत या दोन नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे सुद्धा समजलेले नाही. एएनआयने या भेटीबद्दल ट्विट केले आहे.

'व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग'

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट आहे. सरकार स्थापनेपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रणही देण्यात आले होते. 

नव्या विषाणूमुळे सावधानतेचा इशारा, फ्लूसारखीच लक्षणे

आदित्य ठाकरे दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी दिल्लीतील फेसबुकच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदीही होत्या. या भेटीबद्दलचे ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.