पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासात घट

पुलवामा हल्ला (संग्रहित छायाचित्र)

गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासामध्ये घट झाली आहे, सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गेल्यावर्षी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोरोना : पुण्यातील नायडू रुग्णालयातील सेवेने चिनी प्रवासी भारावला

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर-जम्मू महामार्गावरून सैन्यदलाच्या विविध वस्तू आणि अन्नधान्य यांची वाहतूक केली जाते. त्यासोबत काही जवानही असतात. वर्षापूर्वी या महामार्गावरून एकावेळी सैन्यदलाच्या १० ते ७० गाड्या एकाचवेळी प्रवास करीत असत. पण आता त्यामध्ये घट झाली असून महिन्याच्या कालावधीत सैन्यदलाच्या सात ते आठ गाड्या या महामार्गावरून प्रवास करतात. सोबत अन्नधान्य आणि सैन्यदलाला लागणाऱ्या विविध वस्तूही असतात.

गेल्यावर्षी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले होते. मिराज विमानांच्या साह्याने रात्रीत हे हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल एफ १६ विमाने भारताच्या दिशेने पाठविण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून लढाऊ विमाने पाठविण्यात आली. भारताचा एक वैमानिक अभिनंदन वर्थमान त्यावेळी पाकिस्तानी हद्दीत पडला होता. पण पाकिस्तानने त्याला पुन्हा भारताकडे सुपूर्द केले होते.

पुलवामा : शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, आश्वासनांची पूर्तता नाहीच

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार घुसखोरांविरोधात काश्मीरमध्ये झालेल्या विविध कारवायांमुळे दहशतवादी कारवाया खूप आटोक्यात आल्या आहेत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर जम्मू महामार्गावरून आता अधिक सुरक्षेसह जवानांची ने-आण केली जाते.