पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओव्हरलोडिंगमुळे ट्रक चालकाला तब्बल १,४१,७०० रुपयांचा दंड

संग्रहित छायाचित्र

देशात १ सप्टेंबरपासून सुधारित वाहतूक अधिनयम लागू झाल्यापासून वाहनधारकांमधून असंतोष व्यक्त होताना दिसत आहे. रोज हजारो रुपये दंडाची आकारणी केल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध होत आहे. त्यातच आता आणखी एकाची भर पडली आहे. राजस्थानच्या एका ट्रक चालकाला ५ सप्टेंबर रोजी ओव्हरलोड ट्रकमुळे तब्बल १,४१,७०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे. संबंधित चालकाने दिल्लीतील रोहिणी न्यायालयात ही रक्कम भरली आहे. 

नुकताच ओडिशा येथे आरटीओने एका ट्रक चालकाला ८६,५०० रुपयांचे चलन कापले होते. नंतर तडजोडीअंदी ही रक्कम ७० हजार करण्यात आली. चालकावर अनाधिकृत व्यक्तीला वाहन चालवायला देणे (५००० रु), विना परवाना (५००० रु), ओव्हरलोडिंग (५६,००० रु), परिमाणाचा अंदाज न घेता वाहन चालवणे (२०,००० रु) आणि सामान्य गुन्हा (५०० रु) दंड लावण्यात आला.

इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्याने भारतात मागितले शरण

यापूर्वी गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी एक ट्रॅक्टर-ट्रॉली चालकाचे ५९,००० रुपयांचे चलन कापले होते. १० वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसानी त्याला दंड केला होता.