पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दिल्लीतील तबलिगी समाजातील घटना म्हणजे तालिबानी स्वरुपाचा गुन्हा'

मुख्तार अब्बास नक्वी

देशात लॉकडाऊन सुरू असताना दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलगी समाजाचे मुख्यालय असलेल्या मरकजमध्ये झालेला धार्मिक कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे तालिबानी स्वरुपाचा गुन्हाच असल्याचे स्पष्ट मत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या घटनेची तीव्र शब्दांत निंदा केली. 

छोट्या सरकारी गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात मोठी कपात

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. या काळात सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यावरही बंदी आहे. देशातील ९९ टक्के लोक ज्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील नागरिकही आहेत. हे सर्व लॉकडाऊनचे समर्थन करीत आहेत. अशा स्थितीत मरकजमध्ये झालेला धार्मिक कार्यक्रम म्हणजे तालिबानी पद्धतीचा गुन्हाच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पाईपलाईनद्वारे पुरवला जाणारा घरगुती गॅस, सीएनजी होणार स्वस्त

अशा स्वरुपाच्या गुन्ह्याला केवळ कायद्यानुसारच नाही तर देवाच्या दारातही माफी मिळणार नाही, असे सांगून मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, एका चुकीमुळे अनेक व्यक्तींचे आयुष्य संकटात सापडले आहे. प्रशासन आणि पोलिसांनी यामागे असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वेळी बेजबाबदारपणा दाखवून चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.