पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामियातील पोलिस कारवाईत एका डोळ्याची दृष्टी गमावली, विद्यार्थ्याचा आरोप

मोहम्मद मिन्हाजुद्दीन

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून (एनआरसी) गेल्या आठवड्यात १५ डिसेंबरला दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये केलेल्या कारवाईत एका विद्यार्थ्याला आपल्या एका डोळ्याची दृष्टी गमवावी लागल्याचे या विद्यार्थ्याने म्हटले आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयात पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे घडल्याचे मोहम्मद मिन्हाजुद्दीन या विद्यार्थ्यांने म्हटले आहे. मोहम्मद हा मूळचा बिहारमधील असून, विधी शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तो दिल्लीत आला आहे. पण दिल्लीत घडलेल्या या सगळ्या प्रकाराने मोहम्मद घाबरून गेला असून, आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर तो परत बिहारला जाणार आहे. दिल्लीत विद्यापीठामध्ये राहणेही सुरक्षित नसल्याचे त्यांने म्हटले आहे.

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका

मोहम्मद एलएलएमचे शिक्षण घेतो आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरचा माझा विश्वास उडाला आहे. मोहम्मद म्हणाला, या सगळ्या प्रकारामध्ये माझी चूक काय होती. मी त्या दिवशी ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो. पोलिस विद्यापीठाच्या आवारात आल्याचे कळल्यावर आम्ही अभ्यासिका आतून बंद केली. पण तरीही पोलिसांनी आत प्रवेश केला आणि आम्हाला मारण्यास सुरुवात केली. 

मोहम्मद म्हणाला, अभ्यासिकेतील आम्ही कोणीही निदर्शने करीत नव्हतो. आम्ही अभ्यास करीत होतो. तरीही पोलिसांनी अभ्यासिकेत प्रवेश केला. विद्यापीठाच्या प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळ निदर्शने सुरू होती. तिथून अभ्यासिका लांब आहे. तरीही पोलिस मुद्दामहून तिथे आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होणार अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर

मोहम्मदच्या हातावरही फ्रॅक्चर झाले आहे. माझ्या दुसऱ्या डोळ्यालाही जंतूसंसर्ग झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे त्यांनी मला जास्त काळजी घेण्यास सांगितले आहे, असे मोहम्मद म्हणाला.