पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोव्यात मिग विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

गोव्यात मिग विमान कोसळले

प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे मिग-२१ के लढाऊ विमान शनिवारी कोसळले. वैमानिक वेळीच विमानातून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. पक्षी धडकल्यामुळे इंजिनाला आग लागली आणि हे विमान अपघातग्रस्त झाल्याचे नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मढवाल यांनी माध्यमांना सांगितले. 

कॅप्टन एम शेवखंद आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव हे विमान उडवत होते. विमान हवेत असताना एक पक्षी इंजिनला धडकले आणि इंजिनाने पेट घेतल्याचे सांगण्यात येते. दोन्ही वैमानिक वेळीच पॅराशूटने विमानाबाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या दुर्घटनेत विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. वेर्णा एमआयडीसीजवळ हे विमान कोसळले. सुदैवाने निर्मनुष्य ठिकाणी हे विमान कोसळले.

गेल्यावर्षी गोव्यातील विमानतळावरुन मिग २९ विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच रन-वेवरुन घसरले होते. त्यावेळी धावपट्टीचे नुकसान झाले होते. काही काळ विमानतळ बंद ठेवावे लागले होते. 

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना विषबाधा

दरम्यान, १९९९ मध्ये कारगिल युद्धावेळी मिग-२९ ने उल्लेखनीय कामगिरी केली होती.