पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिक्षक नव्हे कसाई; ३ मुलांसह पत्नीची केली हत्या

शिक्षक नव्हे कसाई; ३ मुलांसह पत्नीची केली हत्या (ANI)

देशाची राजधानी दिल्लीतील महरौली येथे ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सर्वांचीच हत्या केली आहे. यामध्ये पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. उपेंद्र शुक्ला नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे. ४२ वर्षांचा उपेंद्र हा शिकवणी घेत असत. त्याने पत्नी अर्चना शुक्ला आणि ६, ५ वर्षांची आणि २ महिने अशा तीन मुलांची हत्या केली. 

उपेंद्रने स्वतः चिठ्ठी लिहून खुनाची कबुली दिली आहे. पण यामागचे कारण त्याने सांगितलेले नाही. याप्रकरणी उपेंद्रला अटक केले असून त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांनी दिली. उपेंद्रने तिघांच्या गळ्यावर वार केला होता. पोलिसांनी तो चाकू ही जप्त केला आहे. 

नाशिकः कॉन्स्टेबलचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोघांचाही मृत्यू

उपेंद्र गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, असे शेजाऱ्याच्यांनी म्हटले आहे. उपेंद्रच्या कुटुंबियांबरोबर त्याची सासूही राहत होती. सकाळी उपेंद्रने उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.