पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाने मारली उडी

सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारणारा तरुण

दिल्लीतील प्राणी संग्रहालयातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका तरुणाने प्राणी संग्रहालयातील सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली. यामुळे प्राणी संग्रहालयातील सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. तब्बल एक मिनिटं हा तरुण सिंहाच्या जवळ बसून होता. मात्र सिंहाने त्याला काहीच केले नाही. सुरक्षा रक्षकाच्या मदतीने या तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

५ वर्षांत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था 'नामुमकीन'

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण सिंहाजवळ बसलेला दिसत आहे. सिंह त्याच्याजवळ येतो. त्याला रागामध्ये पाहत त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून हा तरुण उठून उभा राहतो.' दरम्यान प्राणी संग्रहालयातील १० सुरक्षारक्षकांनी या तरुणाचे प्राण वाचवले आहे. सिंहाच्या जाळ्यातू त्याची सुखरुप सुटका केली आहे. 

मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

दरम्यान, हा तरुण ज्यावेळी सिंहाच्या पिंजऱ्यावर चढत होता त्यावेळी उपस्थितीत पर्यटकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या तरुणाचे नाव रेहान खान (२८ वर्ष) असून तो बिहारचा आहे. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याची देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. 

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटेची छपाई केली बंद