पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मॉब लिंचिंगविरोधात कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र, कडक शिक्षेची मागणी

पंतप्रधान मोदी

चित्रपटसृष्टीत काम करणारे अभिनेते, दिग्दर्शक  आणि इतर मंडळींनी मॉब लिंचिंग (जमावाकडून होणारे हल्ले) प्रकरणात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. अनुराग  कश्यप,  मणी रत्नम्, कोंकणा सेन शर्मासह चित्रपटसृष्टीतल्या ४९ कलाकारांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. भारतात वाढत चाललेल्या मॉब लिंचिंग  प्रकरणात कलाकारांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मॉब लिंचिंग प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी कलाकारांनी केली आहे. 

काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीचा प्रश्नच नाही - राजनाथ सिंह

 'राम' हा शब्द भारतीयांसाठी पवित्र आहे, मात्र आता रामाच्या नावावरून अनेकांचा बळी घेतला जात आहे. या गोष्टी इथेच थांबायला हव्यात असं कलाकारांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  संसदेत मॉब लिंचिंग प्रकरणात  पंतप्रधान या नात्यानं तुम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला मात्र  ते पुरेसे नाही, दोषींसाठी कडक नियम आणि शिक्षा असलीच पाहिजे.  मॉब लिंचिंग हे अमानवी कृत्य आहे असंही या कलाकारांनी पत्रात लिहिलं आहे. 

पाकिस्तानात ४० दहशतवादी गट कार्यरत होते, इम्रान खान यांची कबुली

ही लोकशाही आहे, येथे प्रत्येकाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. घटनेनं अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला दिला आहे. अशावेळी मतप्रदर्शन केल्यानंतर  शहरी नक्सलवादी, देशद्रोहीचा ठपका ठेवला जातो. धर्माच्या नावाखाली कोणाचाही बळी घेतला जातो, ही परिस्थिती पुढे कायम राहिली तर देश कधीही पुढे जाणार नाही.  हा आम्हा कलाकारांचा सल्ला आहे तो योग्य  प्रकारे घ्यावा अशी विनंती कलाकारांनी मोदी सरकारला  केली आहे.