पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रपती भवनातील शाही भोजनाने ट्रम्प यांच्या दौऱ्याची सांगता

राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाने ट्रम्प यांचा भारत दौरा सफल

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित राजकीय भोजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी परदेशी पाहुण्यांचे याठिकाणी स्वागत केले. 

दिल्ली पेटवण्यामागे काँग्रेसचा हात, रामदास आठवलेंचा आरोप

भारत दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या शाही भोजनाच्या कार्यक्रमानेच ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची सांगता झाली. राष्ट्रपती कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातील हॉलमधील पाचव्या युगातील गौतम बुद्धांच्या प्रतिमेसह अन्य भारतीय नेत्यांची फोटोचे ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना दर्शन घडवले. त्यानंतर दोन्ही नेत्यामध्ये काही वेळ चर्चाही झाली. 

डोनाल्ड ट्रम्प अन् मेलानिया ट्रम्प मायदेशी परतले

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याला भारतीय नागरिकांनी दिलेली दाद ही दोन्ही देशांतील संबंध अतुट असल्याचे ग्वाहीच आहे, असे रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे स्थान हे भारतासाठी महत्त्वाच्या मित्रामधील आहे. दोन्ही राष्ट्र मित्रत्वासाठी एकमेकांसोबत कट्टिबद्ध राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांच्या हा दौरा व्यापार आणि संरक्षण कराराच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण ठरला, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. 

मोदी-ट्रम्प बैठकः भारताबरोबर ३ अब्ज डॉलरचा संरक्षण करार, पाकलाही सुनावले

भारत दौरा हा अद्धभूत अनुभूती देणारा होता, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी अनुभवल्या. राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या भव्य स्वागताबद्दल त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही आभार मानले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A dinner banquet will be hosted by the President in the honour of the US President Donald Trump