पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधी पक्षनेत्यांसह राहुल गांधी आज काश्मीर दौऱ्यावर

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह शनिवारी काश्मीरचा दौरा करणार आहेत. केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी आणि आरजेडीचे नेते मनोज झा हे नेते राहुल गांधीसोबत काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.  

J&K : राज्यपाल म्हणाले, राहुल गांधींसाठी खास विमान पाठवतो

केंद्राने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष द्यावे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता.  त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर दौऱ्यावर येण्याबाबत निमंत्रण दिले होते. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा काश्मीरमध्ये येऊन आढावा घ्यावा. त्यानंतर भाष्य करावे. काश्मीर दौऱ्यावर येण्यासाठी त्यांना विमान पाठवतो, असा टोमणा सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधीना लगावला होता.  

काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल

राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांचे निमंत्रण स्वीकारल्याचे प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून दिली होती. आम्हाला विमान पाठवू नका. पण काश्मीर दौऱ्यावर आल्यानंतर तेथील नेते आणि जनतेला भेटण्याचे स्वातंत्र्य द्या, या शब्दांत राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांना प्रत्त्युतर दिले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A delegation of Opposition party leaders to visit SRINAGAR tomorrow Congress leaders Rahul Gandhi And Other Leader will also be a part of the delegation