पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटलमध्ये आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या संशयित रुग्णाने आत्महत्या केली. या संशयित रुग्णाला जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये बुधवारी दाखल करण्यात आले होते. आत्महत्याचे कारण अजून समजू शकलेले नाही. पोलिस आणि प्रशासन याप्रकरणी तपास करत आहेत. 

तयारी न करता सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय, सोनिया गांधींची टीका

मिळालेल्या माहितीनुसार, शामली जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेसन वॉर्डमध्ये दाखल एका कोरोना संशयित युवकाने गुरुवारी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रुग्णालयात माध्यमांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. 

शिंकेतून ८ मीटरपर्यंत पसरु शकतो कोरोना विषाणू, संशोधकांचा दावा

जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी कोरोना संशयित युवकाच्या आत्महत्येला दुजोरा दिला आहे. दरम्यान, यापूर्वी गेल्या महिन्यात दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातही एक कोरोना विषाणूची बाधा झालेल्या संशयित युवकाने आत्महत्या केली होती. या युवकाने सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेला हा ३५ वर्षीय युवक नुकताच ऑस्ट्रेलियातून परतला होता.

वर्ल्ड कप : धोनी-युवी शिवाय या त्रिकुटाचे योगदानही अविस्मरणीयच!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A coronavirus COVID19 symptomatic man has committed suicide in quarantine ward of a hospital in Shamli district up