पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या मनधरणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

राहुल गांधींच्या मनधरणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न (ANI)

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदीर स्वीकारत राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम असून सातत्याने ते पक्षाला उत्तराधिकारी निवडण्यासाठी सांगत आहेत. काँग्रेस नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच राहुल यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. याचदरम्यान एका कार्यकर्त्याने काँग्रेस कार्यालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे निराश होत या कार्यकर्त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यावेळी उपस्थितीत असलेल्या पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला तसे करण्यापासून रोखले. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर एक कार्यकर्त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा, नाहीतर मी गळफास घेईन असे तो म्हणत होता.

दरम्यान, राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असून पक्षाने काँग्रेस अध्यक्षाचा शोध घेण्यास सांगितले आहे.