पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुजरातमध्ये कोरोनाने घेतला आणखी एकाचा बळी!

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

देशातील कोरोना विषाणूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाने आपला जीव गमावलाय. ४६ वर्षीय रुग्णावर अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. या रुोग्णाच्या मृत्यूनंतर गुजरातमधील कोरोना विषाणूची लागण होऊन मृत पावलेल्यांचा आकडा हा चारवर पोहचला आहे.

मोदींनी फोनवरुन थेट नायडू रुग्णालयातील नर्सशी साधला संवाद, अन्...

२६ मार्च रोजी उच्च रक्तदाबाच्या त्रासानंतर संबंधित रुग्णाला सरदार वल्लभभाई सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला मधुमेहाचा देखील त्रास होता.  या रुग्णासह गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये आतापर्यंत दोघांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर सुरतमधील एक आणि भावनगरमधील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

इराण: मिथेनॉलने कोरोना बरा होतो, या अफवेने घेतला ३०० जणांचा बळी

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढताना दिसत आहे. जागतिक संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आर्थिक घडी कोलमडण्याची परवा न करता मोदी सरकारने कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डेस्टिंगसिंगशिवाय सध्याच्या घडीला आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. घरात बसून आपण कोरोनाला उंबरठ्यावर रोखावे, असे आवाहन वेळोवेळी नागरिकांना करण्यात येत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A 46 year old COVID19 positive patient death in Ahmedabad Gujarat rises to 4 deaths Dut To coronavirus