पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू

विमान अपघात

अमेरिकेच्या दक्षिण डकोटा राज्यात विमान अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह नऊ जणांचा मृत्यू आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हवामान खात्याने शनिवारी वादळाचा इशारा दिला होता. तरी सुध्दा विमानाचे उड्डाण करण्यात आले होते.

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध

अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये १२ जण प्रवास करत होते. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विमानाने चेंबरलेन येथून उड्डाण केले होते. हे विमान इदाहो फॉल्सकडे जात होते. 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल: छगन भुजबळ

फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या वृत्तानुसार, चेंबरलेन विमानतळापासून एका मैलांच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. पिलाटस पीसी - १२ एक सिंगल इंजिनवाले टर्बोप्रॉप विमान होते. मृतकांमध्ये वैमानिकाचा देखील समावेश आहे. या विमान अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. 

१ डिसेंबरपासून हे ५ नियम बदलले; ज्याचा थेट परिणाम खिशावर