पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात; ९ जण ठार

उत्तर प्रदेश अपघात

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यामध्ये सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. बांदा टांडा महामार्गावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

चंद्रपूरमध्ये हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी

हा अपघात तिंदवारी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सैमरी गावाजवळ झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. 

सिंचन घोटाळ्यातील ९ फाईल्स क्लोज, पण..

बस बांदा येथून फतेहपूर येथे जात होती भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयईडीसह तिघांना अटक