पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जमिनीच्या वादातून उत्तर प्रदेशात दोन गटांत गोळीबार; ९ ठार, २० जखमी

घटनास्थळाचे छायाचित्र

जमिनीच्या वादातून पूर्व उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात उभा गावामध्ये दोन गटांत झालेल्या गोळीबारामुळे बुधवारी ९ जण मृत्युमुखी पडले तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावठी कट्ट्यातून दोन गटांतील लोकांनी एकमेकांवर गोळीबार केला. यातच ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून हे सर्व घडले. काही जणांनी तीक्ष्ण शस्त्रांनीही दुसऱ्या गटांतील लोकांवर वार केले आहेत. 

'भाजप-शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा'

सोनभद्रचे जिल्हाधिकारी अंकित कुमार यांनी उत्तर प्रदेशातील एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये गोळीबार झाला, त्यावेळी तिथे १०० जणांचा जमाव होता. दोन्ही गटांकडून गोळीबार आणि वार करण्यात आले. मध्य प्रदेशच्या सीमेवर हे गाव आहे.

हाणामारीत जखमी झालेल्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अंकित आगरवाल आणि पोलिस अधीक्षक सलमान ताज पाटील हे मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी दाखल झाले. गावातील परिस्थिती आता नियंत्रणात आणण्यात आली आहे.