पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात ९ जण ठार

उत्तर प्रदेश अपघात

राजस्थानच्या भीलवाडा- कोटा महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. बस आणि बोलेरोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की बोलेराचा चुराडा झाला. तर बसच्या समोरचा भागाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर

भीलवाडा डेपोची बस सोमवारी रात्री कोट्यावरुन येत होती. तर बोलेरोमधील सर्व जण मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील संधार गावचे होते. भीलवाड येथील लग्न समारंभावरुन ते घरी परत येत होते. त्रिवेणी आणि बिगोद दरम्यान पावन धामजवळ बसची आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये एका चिमुकलीसह ९ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले.

चीनमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या संख्या १००० पार

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना भीलवाड येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतांमध्ये ५ महिला, ३ पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. तर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत प्रशासनाला ताबडतोब मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. 

राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला, २४ फेब्रुवारीपासून अधिवेशन