पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ वरः आरोग्य मंत्रालय

लव अग्रवाल, संयुक्त सचिव, आरोग्य मंत्रालय

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून ८१ वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आतापर्यंत ८१ प्रकरणे समोर आल्याचे सांगितले. यात ६४ भारतीय, १६ इटली आणि एक कॅनाडाचा नागरिक असून ही आरोग्य आणीबाणी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव अनिल मलिक म्हणाले की, भारत-बांगलादेश बस/रेल्वे सेवा १५ एप्रिलपर्यंत निलंबित राहतील. भारत-नेपाळ सीमेसह ४ चौक्या सुरु राहतील. भूतान आणि नेपाळच्या नागरिकांसाठी मुक्त प्रवेश जारी राहिल. 

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत, असे ४००० हून अधिक लोक शोधण्यात आले आहेत. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत ४२,२९६ प्रवाशांना भारतात आणले आहे. यामध्ये २५५९ जणांमध्ये विषाणूंची लक्षणे दिसून आली आहे. ५२२ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील १७ परदेशी नागरिक आहेत.

नागरी उड्डयन मंत्रालयाच्या संयुक्त सचिव रुबीना अली यांनी म्हटले की, एअर इंडिया मिलानमध्ये (इटली) फसलेल्या भारतीयांना परत आणणार आहे. हे विमान शनिवारी दुपारी रवाना होईल आणि रविवारी सकाळी दिल्ली विमानतळावर उतरेल.

जपानहून १२४ आणि चीनवरुन ११२ जणांची दुसऱ्यांदी केलेली कोरोना विषाणू चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. जास्त दराने मास्क विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर ही आरोग्य आणीबाणी नाही. मी आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत, असे त्यांनी सांगितले.