पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्षेपणास्त्र हल्ल्यात '८० अमेरिकी दहशतवादी' मारले गेले, इराणचे प्रत्युत्तर

अमेरिकेच्या तळांवर इराणकडून हल्ले करण्यात आले

इराकमधील अमेरिकेच्या ताब्यातील तळांवर इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये किमान ८० 'अमेरिकी दहशतवादी' मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणमधील सरकारी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. इराणकडून डागण्यात आलेली कोणतीच क्षेपणास्त्रे निकामी करण्यात अमेरिकेला यश आले नाही आणि सर्व क्षेपणास्त्रांनी आपले लक्ष्य अचूकपणे साधले, असेही इराणने म्हटले आहे. 

भविष्यात काहीही घडू शकते: सुधीर मुनगंटीवार

इराणमधील वरिष्ठ रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जर यापुढे कोणतेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला तर इराकमधील अमेरिकेच्या आणखी १०० तळांवर आमचे लक्ष आहे, असाही इशारा इराणने दिला आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या हेलिकॉप्टरचे आणि लष्करी साधनसामुग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावाही इराणकडून करण्यात आला आहे. 

नागपूर जिल्हा परिषदेत गडकरी-बावनकुळेंना मोठा धक्का

बुधवारी पहाटे इराणकडून इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आले. अमेरिकेकडून ड्रोनच्या साह्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचा वरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानी मारला गेला होता. त्यानंतर या दोन्ही देशांमधील तणावाची स्थिती वाढली आहे.