नेपाळमध्ये केरळच्या ८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांचा मृतदेह दमन येथील हॉटेलच्या एका रुममध्ये सापडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये ५ लहान मुलांचा समावेश आहे. केरळमधील १५ जणांचा ग्रुप नेपाळच्या पोखरा येथे फिरण्यासाठी आला होता. गॅस हिटरमुळे पर्यटकांचा मृत्यू झाले असल्याचे सांगितले जात आहे.
Nepal: 8 tourists from Kerala found dead in a hotel room of a resort in Daman. SP Sushil Singh Rathore of District Police Office, Makwanpur says, "We are yet to identify the name of the deceased. They were using gas heater in the room, suffocation might have caused their death."
— ANI (@ANI) January 21, 2020
अशोभनीय, निंदनीय...नव्या व्हिडिओवर संभाजीराजे संतप्त
पोखरा हे नेपाळमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. काठमांडूपासून १०० किलोमीटर दूर दामन येथे एका हॉटेलमध्ये केरळमधील १५ पर्यटक थांबले होते. त्यांनी दोन रुम बुक केल्या होत्या. थंडी जास्त असल्यामुळे त्यांनी हॉटेलच्या रुममध्ये गॅस हिटर लावले होते. मात्र सकाळी एका रुममध्ये असलेले ८ पर्यटक बेशुध्दावस्थेत सापडले. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काठमांडु येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हवी तेवढी निदर्शने करा, CAA मागे घेणार नाही - अमित शहा
थंडीमुळे त्यांनी रुममध्ये गॅस हिटर लावला होता. या गॅस हिटरमधील गॅसमुळे गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर केरळचे मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून मृतकांच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली. जयशंकर यांनी देखील या सर्वांच्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला
मृतांमध्ये प्रवीण कृष्ण नारायण (३८ वर्ष), शारण्य शशि (३५ वर्ष), रंजीत कुमार एपी (३४ वर्ष), इंद्र लक्ष्मी (९ वर्ष), श्रीभद्र (७ वर्ष), आर्चा प्रवीण (५ वर्ष), अभिन शौरनाय नायर (५ वर्ष) आणि वैष्णव रंजीत (२ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्व ५ ही मुलांचे वय १० वर्षाच्या आतमध्ये आहे. उर्वरीत ७ पर्यटक काठमांडु येथे आहेत.