पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनंतनागमध्ये उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला, ८ जण जखमी

काश्मीरमधील दहशतवादी हल्ला (संग्रहित फोटो)

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात किमान ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

अमेरिकेच्या व्हिसा नियमात बदल, अनेक भारतीयांना फटका बसणार

अनंतनागमध्ये पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतो. तिथेच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. पण त्यांचा नेम चुकल्यामुळे पोलिसांच्या दिशेने फेकलेले ग्रेनेड रस्त्यावर पडले आणि तेथून जाणारे पादचारी नागरिक जखमी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे अनंतनागमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आता नाराजी सोडून एकत्रितपणे लढले पाहिजे - शरद पवार

या घटनेनंतर पोलिसांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.