पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नसोहळ्यावर काळाचा घाला; भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडले

अपघात (प्रतिकात्मक छायाचित्र)

बिहारच्या लखीसराय येथे बुधवारी रात्री भीषण रोड अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेला ट्रक लग्नाच्या वरातातील घुसला. या दुर्घटनेमध्ये ट्रकने वरातीत असलेल्या अनेकांना ट्रकने चिरडले. यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना लखीसरायच्या हलसी बाजार येथे घडली आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोका करत आंदोलन केले आणि मदतीची मागणी केली.

नागपूर महामेट्रो डेटा लीक प्रकरणात दोन जणांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, लखीसरायच्या हलसी बाजार येथे लग्न होते. या लग्नासाठी विशनपूर गावातून वरात आली होती. वरातीमध्ये अनेक जण सहभागी झाले होते. रस्त्यावरुन वरात जात असताना अचानक भरधाव वेगात आलेला ट्रक वरातीमध्ये घुसला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक आधी विजेच्या खांबाला धडकला त्यानंतर तो वरातीमध्ये घुसला. या अपघातामध्ये ट्रकने वरातीमधील अनेकांना चिरडले. यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री ही घटना घडली असून अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

संध्याकाळपर्यंत विधानसभा अध्यक्षांना भेटा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. या घटेमध्ये गावामध्ये तणावाचे वातावरण होते. संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको करत आंदोलन केले. दरम्यान, सर्वांनी मदतीची मागणी केली. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक जप्त केला असून अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. 

वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्यावर घरांवर सीबीआयचे छापे