पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात; ८ जण ठार

उत्तर प्रदेश अपघात

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींवर उत्तर प्रदेशच्या मौरानीपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या पंजवाह येथून प्रवाशांना घेऊन कार खैरी खुरौडा येथे जात होती. गुरसराय-मऊरानीपूर मार्गावर राजपूरजवळ कार पोहतचाच समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातामध्ये ८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले. 

मुंबईत भिकाऱ्यांची संपत्ती बघून पोलिसही चक्रावले, बँकेत ८

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.  

धक्कादायक! भुसावळमध्ये भाजप नगरसेवकांसह कुटुंबातील