पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोणी घर देता का घर, ८ फूटांच्या क्रिकेटप्रेमीला उंचीमुळे राहायला जागा मिळेना

८ फूटांच्या क्रिकेटप्रेमीला उंचीमुळे जागा मिळेना

उंचीमुळे  अफगाण क्रिकेट संघाचा चाहता असलेल्या शेर खानला राहायला जागा देण्यास हॉटेल मालकांनी नकार दिला आहे. ८  फूट उंच असलेले शेर खान  अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज् सामना पाहण्यासाठी लखनऊमध्ये आले होते.  मात्र त्यांना उंचीचं कारण सांगत अनेक हॉटेल मालकांनी राहायला जागा देण्यास नकार दिला. 

गोव्यातील या प्रसिद्ध ठिकाणी फोटोसाठी भरावा लागणार ५०० रुपयांपर्यंत कर

लखनऊमध्ये आलेल्या या वाईट अनुभवामुळे खान यांनी पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांना राहायला जागा शोधण्याची विनंती त्यांनी केली.  अखेर पोलिसांनी लखनऊमधल्या नाका परिसरातील हॉटेल राजधानीमध्ये त्यांची सोय करुन दिली.  मंगळवारची रात्र त्यांनी या परिसरातच घालवली.

मात्र आठ फूट उंचीचा माणूस यापूर्वी कधीही न पाहिल्यामुळे बघ्यांची गर्दी हॉटेल परिसरात जमली होती. मुळेच काबुलचे रहिवाशी असलेल्या खान यांना पाहण्यासाठी किमान २०० लोक हॉटेल बाहेर जमले होते. यामुळे खान काहीसे  नाराज झाले होते, असं हॉटेल मालक रानू हे एएनआयशी बोलताना म्हणाले.

तरुणीच्या कॉकपीटमधल्या 'त्या' फोटोमुळे वैमानिकाची नोकरीच गेली

लोकांची खान यांना पाहण्यासाठी खूपच गर्दी जमल्यानं अखेर पोलिसांनी त्यांना हॉटेलपासून स्टेडिअमपर्यंत सोडलं. पुढचे चार पाच दिवस खान यांचा मुक्काम या शहरात असणार आहे.