पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये वीज पडून ८ मुलांचा दुर्देवी मृत्यू

वीज पडून ८ मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये अंगावर वीज पडून ८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवादा जिल्ह्यातील धानपूर गावामध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर काही जण जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. 

गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज; २२०० जादा बसेस सोडणार

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी काही मुलं शेताजवळ खेळत होती. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्व मुलांनी घराकडे धाव घेतली. मात्र पाऊस जोरात असल्यामुळे ते एका झाडाखाली थांबले. त्यावेळी वीज पडली आणि यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर काशीचक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील काही लोकांची प्रकृती गंभीर आहे. 

बीव्हीजी समूहाचे हनुमंतराव गायकवाड यांची १६ कोटींची 

मृतांमध्ये गणेश मांझी (१५ वर्ष), छोटू मांझी (८ वर्ष), नीतीश मांझी (१२ वर्ष), रमेश मांझी (२६ वर्ष), बालेश्वर मांझी यांचा मुलगा छोटू मांझी (१५ वर्ष), मुन्नी लाल मांझी (९ वर्ष), मोनू मांझी (१५ वर्ष) आणि प्रवेश कुमार (१० वर्ष) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्वजण धानपुर गावात राहणारे आहे.

ICC 'हॉल ऑफ फेम'मध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश