पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०: भारताला मिळाली 'या' ८ देशांची साथ

कलम ३७०: भारताला मिळाला 'या' ८ देशांची साथ

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रात आव्हान देण्याच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानला एकापाठोपाठ धक्के बसताना दिसत आहे. रशियासमवेत अनेक मोठ्या देशांनी हे भारताचे अंतर्गत प्रकरण असल्याचे स्पष्ट केले आहे.

मालदीव सरकारने म्हटले की, भारताने कलम ३७० बाबत जो निर्णय घेतला आहेत. ते त्यांचे अंतर्गत प्रकरण आहे. सर्व सार्वभौम राष्ट्रांना त्यांचे कायदे बदलण्याचे अधिकार आहेत. 

जवाहरलाल नेहरु 'गुन्हेगार', कलम ३७० वर शिवराजसिंहांचे वक्तव्य

श्रीलंकेनेही याबाबत भारताची बाजू घेतली. जम्मू-काश्मीरपासून लडाख वेगळे करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. लडाखची ७० टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्माशी संबंधित आहे. अशावेळी लडाख पहिले भारतीय राज्य असेल जिथे बौद्धांचे बहुमत आहे. हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे, असे श्रीलंकेने म्हटले.

बांगलादेशः कलम ३७० हटवणे हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. अशावेळी आमच्याकडे कोणाच्याही अंतर्गत प्रकरणावर बोलण्याचा अधिकार नाही.

संयुक्त अरब अमिरात (यूएई): हे बदल सामाजिक न्याय आणि सुरक्षेला आणखी चांगली करतील अशी अपेक्षा आहे. स्थानिक शासनात लोकांचा विश्वास वाढेल.

शोपियाननंतर डोवाल उतरले अनंतनागच्या ररत्यावर

रशियाः भारताच्या निर्णयाचे रशियाने समर्थन करताना म्हटले की, हे भारताच्या संविधानाअंतर्गत येते. अपेक्षा आहे की, भारत आणि पाकिस्तान आपापसातील मतभेद शिमला समजोत्याच्या आधारावर द्विपक्षीय स्तरावर सोडवतील.

अमेरिका सरकारने म्हटले की, काश्मीरबाबत आमच्या नितीमध्ये कोणताच बदल नाही. भारत आणि पाकिस्तानने शांतता आणि संयम बाळगून थेट चर्चा करुन आपापसातील मतभेद दूर करावेत. 

चीनः आम्ही भारत आणि पाकिस्तानला शेजारचे मित्र मानतो. दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या माध्यमातून मुद्दे सोडवावेत, असे चीनने म्हटले आहे. परंतु, पाकिस्तानने या मुद्द्यावरुन चीनचा आपल्याला पाठिंबा मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

जम्मू-काश्मिरच्या विभाजनाचा प्रस्ताव कॅबिनेटकडून ७ मिनिटांत मंजूर

ब्रिटनने भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर मध्यस्थी किंवा हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दि्वपक्षीय मुद्दा आहे आणि आम्हाला यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.