पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच दिवसांच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा चीनमध्ये आढळले कोरोनाचे नवे रुग्ण

कोरोना विषाणू

रविवारी संपलेल्या पाच दिवसांमध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकाही रुग्ण आढळला नव्हता. पण सोमवारी पुन्हा एकदा ७८ रुग्ण आढळल्याने चीनमधील सामान्य नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. नव्याने आढळलेल्या ७८ रुग्णांपैकी ७४ परदेशातून आलेले आहेत. तर चार हे चीनमधीलच आहेत. त्याचवेळी चीनमधील सर्वाधिक प्रभावित हुबैई प्रांतात सोमवारी कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गचा दुसरा टप्पा सुरू झाला का अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर, ४ नवे रुग्ण आढळले

चीनमधील हुबैई प्रांताची राजधानी वुहानमध्येच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वात आधी कोरोना विषाणूचे संक्रमण सुरू झाले होते. या आजारामुळे चीनमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. आता कोरोना विषाणूचे संक्रमण जगातील सर्व देशांमध्ये झाले आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण ८१०९३ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना : शाहीन बागमध्ये पोलिसांची कारवाई, आंदोलकांना हटविले

चीनमध्ये गेल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत नव्हते. रविवारी संपलेल्या पाच दिवसांमध्ये एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळला नव्हता. पण सोमवारी पुन्हा एकदा ७८ रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक दिवस वुहानामधील लाखो लोकांना लॉकडाऊन करून ठेवण्यात आले होते. त्यामुळेच कोरोना विषाणूचे संक्रमण आटोक्यात आले होते. आता जगातील इतर देशांमध्ये हीच रणनिती वापरण्यात येत आहे.