पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

७४ व्या वर्षी 'ती' झाली जुळ्या मुलींची आई

एरामती मंगयाम्मा

एका वयोवृध्द महिलेने बाळाला जन्म दिला हे ऐकल्यावर कोणाला सुध्दा आश्चर्य वाटले. पण आंध्रप्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका ७४ वर्षाच्या वृध्द महिलेने गुरुवारी जुळ्या मुलींना जन्म दिला. लग्नानंतर तब्बल ५४ वर्षानंतर ही महिला आई झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या वयामध्ये बाळाला जन्म देणारी ती सर्वात वयोवृध्द भारतीय महिला आहे. यापूर्वी पंजाबमधील ७० वर्षाच्या दलजिंदर कौर या वृध्द महिलेने २०१६ मध्ये बाळाला जन्म दिला होता. 

विधानसभा २०१९: पुणेकरांनो मत देण्यापूर्वी हा अहवाल नक्की वाचा

एरामती मंगयाम्मा असं या महिलेचे नाव आहे. आंध्रप्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातल्या नेलापार्थिपदू या गावामध्ये त्या पती राजा राव (८० वर्ष) यांच्यासोबत राहतात. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी कोथपेट येथील अहिल्या रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला. ऐवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आई झाल्यामुळे मंगयाम्मा यांना खूप आनंद झाला आहे. 

एअरसेल प्रकरणात चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला दिलासा

एरामती मंगयाम्मा आणि राजा राव यांचे लग्न २२ मार्च १९६२ साली झाले होते. लग्नानंतर त्यांनी मुल होण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना मुल झाले नाही. काही महिन्यांपूर्वी मंगयाम्मा यांच्या शेजारी राहणारी ५५ वर्षीय महिला आईव्हीएफच्या माध्यमातून आई झाली. हे माहिती पडल्यानंतर मंगयाम्मा यांच्या मनामध्ये आई होण्याचे स्वप्न पुन्हा जागे झाले. 

पेट्रोल-डिझेलवरील गाड्यांवर बंदीचा विचार नाही - गडकरी

त्यानंतर, मंगयाम्मा पतीसोबत अहिल्या रुग्णालयात गेल्या. त्याठिकाणी त्यांनी आयव्हीएफ तंज्ज्ञ डॉक्टर संकयाला उमाशंकर यांची भेट घेतली. या वयात गर्भधारणा होईल की नाही यावर डॉक्टरांचा विश्वास नव्हता. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि मंगयाम्मा गर्भवती राहिल्या. त्यानंतर मंगयाम्मा यांनी याच रुग्णालयात उपचार घेतले. आज सकाळी त्यांनी गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यामुळे मंगयाम्मा यांच्या कुटुंबियांसोबत डॉक्टरांना देखील आनंद झाला. 

चिदंबरम यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला