पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२४ तासांत कोरोनामुळे देशात २८ जणांचा मृत्यू, ७०४ नवे रुग्ण

देशात मागील २४ तासांत कोरोना विषाणूबाधितांच्या आकड्यात वाढ होऊन तो ४२८१ वर पोहोचला आहे. (संग्रहित छा

देशात मागील २४ तासांत कोरोना विषाणूबाधितांच्या आकड्यात वाढ होऊन तो ४२८१ वर पोहोचला आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे १११ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या अहवालानुसार कोरोना विषाणूचा प्रकोप देशातील ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पसरला आहे. आतापर्यंत ४२८१ प्रकरणांना (३८५१ ऍक्टिव्ह प्रकरणे) दुजोरा मिळाला आहे. यामध्ये ६५ विदेशी रुग्णांचा समावेश आहे. या आजारातून ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. 

दोन महिन्यांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत १ लाख ४४ हजार कोटींची घट

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोरोना विषाणूची नवीन ७०४ प्रकरणे समोर आली आहेत. यादरम्यान २८ जणांचा मृत्यू या विषाणूमुळे झाला आहे. देशात सर्वाधिक ६९० रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तिथे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू आहे. तिथे ५७१ लोकांना याची लागण झाली आहे. तिथे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिल्लीत सर्वाधिक ५०३ लोकांना याचे संक्रमण झाले आहे. तिथे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणात आतापर्यंत ३२१ रुग्ण संक्रमित झाले असून तिथेही ७ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ३१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

देशातील ४०६७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७६ टक्के पुरुष

दरम्यान,  आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात आतापर्यंत समोर आलेल्या कोरोना बाधितांच्या प्रकरणात ७६ टक्के पुरुष तर २४ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत मृत रुग्णात ७३ टक्के पुरुष आणि २७ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे.