पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूमुळे इराणनं केली ७० हजार कैद्यांची सुटका

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूमुळे चीननंतर सर्वाधिक बळी हे इराणमध्ये गेले आहेत. आतापर्यंत इराणमध्ये कोरोनामुळे २३७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या २४ तासांत या देशात कोरोनाची लागण झालेले ५९५ नवे रुग्ण समोर आले आहेत त्यातल्या ४३ जणांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनामुळे इराणमधली परिस्थिती भीषण आहे या पार्श्वभूमीवर येथे ७० हजार कैद्यांची अनिश्चित कालावधीसाठी सुटका करण्यात आली आहे. 

उन्हाळ्यात कोरोनाचा धोका टळेल? तज्ज्ञ म्हणतात...

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हजारो कैद्यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे कैदी समाजाला नुकसान पोहचवत नाही तोपर्यंत अनिश्चित कालावधीसाठी त्यांची सुटका करण्यात आली आहे असं इराणनं सांगितलं आहे.  या कैद्यांना पुन्हा कधी तुरुंगात डांबण्यात येईल हे अद्याप स्पष्ट केलंल नाही. चीननंतर कोरोनाचा फटका हा इराणला अधिक बसला आहे. या देशात कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ही सात हजारांहून अधिक आहे. 

पुण्यातील पती-पत्नी दोघांना कोरोनाची लागण, आरोग्य मंत्र्यांनी दिली पुष्टी

इराणमध्ये २० मार्चला नववर्ष साजरं केलं जाणार आहे. यावेळी सुट्ट्या असल्यानं  सर्वाधिक लोक घराबाहेर पडतील अशी भीती आहे. मात्र सध्या इथली परिस्थिती पाहता लोकांना घराबाहेर  न पडण्याच्या सुचना केल्या जात आहेत.