पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; ७ जण ठार

उत्तर प्रदेश अपघात

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये बस दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुंदरबनीजवळ बस दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातामध्ये जखमी प्रवाशांना सुंदरबनी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जम्मू राजकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

फैज अहमद फैज यांना हिंदू विरोधी म्हणणे हास्यास्पद : जावेद अख्तर

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुंछवरुन जम्मूला येत होती. नौशेरापासून १८ किलोमीटर अंतरावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस १ हजार फूट खोल दरीत कोसळली. या बसमधून २५ ते ३० जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य केले. जखमींवर उपचार सुरु आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

'नववर्षात पोलिसांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल'