पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोटातून आणले १० कोटींचं ड्रग्ज; ७ अफगाणिस्तानी नागरिकांना अटक

७ अफगाणिस्तानी नागरिकांना अटक

पोटामध्ये १० कोटींचं ड्रग्ज घेऊन येणाऱ्या ७ अफगाणिस्तानी नागरिकांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हिरोईनच्या कॅप्सूल पोटात लपवून आणल्या होत्या. तब्बल १ किलो ६०० ग्रॅम वजनाचे हिरोईन जप्त करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

'पवारांना जाणता राजा, इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हणणं योग्य होतं का'

अटक केलेल्यापैकी दोन आरोपींनी सांगितले की, एका अफगाणी नागरिकाने त्यांना भारतात पाठवले आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या अफगाणी नागरिक हयातुल्लाहला भेटण्यास सांगितले आहे. पोलिसांनी हयातुल्लाहला विमानतळाबाहेरून अटक करून चौकशी केली. यानंतर पोलिसांनी आणखी एका अफगाणी नागरिक मसूद मोहम्मदला दिल्लीतील लाजपतनगर येथून अटक केली आणि सर्वांना रुग्णालयात पाठविण्यात आले.

मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या लेखकाविरोधात गुन्हा

सातही आरोपींची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांचा एक्स-रे काढला असता डॉक्टरांना त्यांच्या पोटात कॅप्सूल असल्याचे आढळले. अटक केलेल्या सातही आरोपींच्या पोटात २० ते ४० हिरोईनच्या कॅप्सूल होत्या. डॉक्टरांनी सातही जणांच्या पोटातून १७७ कॅप्सूल बाहेर काढल्या. ज्याचे वजन १ किलो ६०० ग्रॅम ऐवढे आहे. पोलिसांनी  म्हणण्यानुसार, या प्रकरणात आणखी काही अफगाणी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान काही नायजेरियन नागरिकांना ही हिरोईन पुरविली जाणार होती, अशी माहिती समोर आली. 

शिवरायांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही: बाळासाहेब थोरात