पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

६४४ उग्रवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

आसाममध्ये सुरक्षेसाठी तैनात जवान

आसाममध्ये विविध उग्रवादी संघटनेच्या ६४४ उग्रवाद्यांनी गुरुवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या सर्व उग्रवाद्यांकडून १७७ शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाचवेळी उग्रवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याची आसाममधील अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

'फक्त कर्जमाफी नकोय, राज्यातील शेतकरी भिकारी नाहीत'

उल्फा, एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या उग्रवादी संघटनांच्या ६४४ उग्रवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमोर आत्मसमर्पणाचा कार्यक्रम झाला.

'जितना उसके सिर पर बाल नहीं उतना मेरे पास माल है'

आसामचे पोलिस महासंचालक भास्कर ज्योती महंता म्हणाले, आसाम पोलिस आणि राज्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. वेगवेगळ्या आठ उग्रवादी संघटनांच्या ६४४ उग्रवाद्यांनी आपली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करून आत्मसमर्पण केले. उग्रवाद्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे, असे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:644 militants of eight banned outfits surrender in Assam along with 177 arms says police chief